Type Here to Get Search Results !

रवींद्र मेश्राम व प्रवीण खानझोडे यांच्या पाठपुराव्याला यश

वणी :

          नगरपालीका हद्दीत मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जे बंद अवस्थेत व दुर्लक्षीत आहे ते पूर्ववत सुरु करण्यात करण्यासाठी नगरपालिकेनी निवेदनाची दखल घेतली.   दि. ०६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व वाचनालय मध्ये महापरीनिर्वानदिनी अभिवादन करण्यात आले.
         यावेळी आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृती आराखडा प्रत देण्यात आली. यावेळी त्यांचे सहकारी व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         वणीकर जनतेची मागणी मान्य केली, त्यासाठी कृती आराखडा सुद्धा तयार करून काम सुरु करणार असे लेखी दिले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत करण्यात येणार. 

          या वाचनालयाची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात येणार व कायमस्वरुपी त्या वाचनालयाला पूर्ववत लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे.  

         यावेळी बबलुभाऊ मेश्राम, प्रविण खान‌झोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी. के.टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम, शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सूरज उपरे, दादाजी देठे, सर्व सहकारी उपस्थित होते.  सर्वांनी सहकार्य केले यावेळी विधायक कामात ज्यांनी सहकार्य त्याचे आभार रवींद्र मेश्राम यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad