Type Here to Get Search Results !

माळीपुरा येथील तरुणावर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला

वणी : 

        शहरातील माळीपुरा येथे राहत असलेल्या प्रणय मुने या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आज सकाळी ०९:०० वाजताच्या सुमारास वर्धा जिल्हातील हिंगणघाट या शहरातील दोन तरुण प्रणय या तरुणाच्या घरात घुसून त्याच्या गळावर हल्ला केला.  या हल्लानंतर तरुणाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले त्यांनतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत आरोपींना अटक करण्यात आली. या तरुणावर हल्ला का केला ? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे वणी शहरात खळबळ उडाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad