मारेगाव :
वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगांव तालुक्यात भूरकिपोड येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेला पक्षाच्या ध्येय-धोरणांची माहिती दिली आणि मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यात स्थानिक विकास, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले.
पक्षाचे नेतृत्व व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विकासाच्या वचनांवर भर दिला, ज्यामुळे स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या