Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्याची मुख्याधिकारीकडे मागणी

वणी, शुभम कडू :
                      शहरातील नगरपालिका हद्दीतील मध्यवस्तीत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे मागील ३ दशकापासून बंद अवस्थेत असून ते दुर्लक्षीत आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षीत धोरणामुळे ही इमारत जाणीवपूर्वक नगरपालिका विभाग मार्फत दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे.  त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्यात यावे, त्यासोबत मुख्यद्वारा जवळ असलेले अतिक्रमण काढण्यात यावे, रंगरंगोटी व साफसफाई करून कायमस्वरुपी वाचनालयाला लोकांसाठी खुले करण्यात यावे. अशी मागणी वणीकर जनतेने मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.

       या मागणीची मुख्याधिकारी यांनी दखल घेवून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दिनांक ०६ डिसेंबर २०२४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पुतळ्याजवळ) आमरण उपोषण करण्यात येणार असून कुठल्याही कायदा सुव्यवस्थेत अडथळा निर्माण झाला तर याकरीता पालीका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी बबलुभाऊ मेश्राम, प्रविण खान‌झोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी.के. टोंगे,  महेश टिपले,  गजानन आत्राम,  शेख मोहंमद अल कमल,  अजय खोब्रागडे, सचिन टिपले,  सूरज उपरे,  दादाजी देठे आणि इतर सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad