वणी :
वणी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व उमेदवार प्रचारात व्यस्त दिसून येत आहे. उमेदवार प्रत्येक गावी भेटी देत असून लोकांना म्हणजे मतदारांना आपली बाजू पटवून देत मी कसा योग्य उमेदवार आहे, हे समजावून सांगताना दिसून येत आहे. या उमेदवारा बरोबरच त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने गावागावात जात असून प्रत्येक घरोघरी आपल्या उमेदवाराचे प्रचार करताना दिसत आहेत. त्याबरोबरच गावातील नागरिकांना आपले निवडणुकीचे चिन्ह कोणते आहेत याबद्दल देखील माहिती देत आहेत.
अशातच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांचा देखील प्रचाराचा झंझावात पहायला मिळत आहेत. त्यांच्या या प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये त्यांच्या सहचारिणी सौ. किरणताई देरकर या देखील त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या देखील स्वतंत्र्य गावात भेटी देत असून कॉर्नर सभेच्या माध्यमातून वणी विधानसभेचा विकासाठी संजय देरकर हे योग्य उमेदवार आहेत हे पटवून देत आहेत. त्यांच्या या कार्याला योग्य प्रतिसाद मिळत असून गावातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहेत. त्याबरोबच स्वतः सौ. किरणताई देरकर मतदारांशी संवाद साधत असल्याने त्यांना त्या त्यांच्या कुटुंबातील वाटत असल्याने गावकरी प्रचंड सहकार्य करत असल्याचे सभेच्या माध्यमातून दिसून येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या