Type Here to Get Search Results !

रानडुकराने शेतकऱ्यावर केला हल्ला, शेतकरी गंभीर जखमी

प्रतिनिधी/कोरा (मंगेश राऊत) :

                                      कोरा परिसर हा जंगलव्याप्त असल्यामुळे व परिसराला लागून मंगरूळ जंगल,खेक जंगल, सुसजंगलाने व्यापलेला परिसर आहे. यामुळे परिसरात नेहमीच वाघाची, रानडुकरांची व अन्य प्राण्यांची नेहमीच दहशत असते. अशातच २५-९-२०२४ रोजी मौजा कोरा येथे रानडुकराने  शेतकऱ्याला शेतात गंभीर जखमी केले.
           प्राप्त माहितीनुसार परसराम पांडू गिरडे वय ६५ वर्ष राहणार कोरा हे शेतात बैल चारण्यासाठी गेले असता  सुमारे चार वाजता च्या दरम्यान त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले वडील आले नाही म्हणून (निलेश) मुलाने शेताकडे सहज जाऊन पाहिले असता गंभीर जखमी अवस्थेत आढळले पोटाला व पायाला मोठ्या प्रमाणात जखम केली. निलेशने फोन करून भावाला बोलवून वडिलाला प्राथमिक आरोग्य केंद्र कोरा येथे आणले परंतु गंभीर जखमी असल्यामुळे येथून सेवाग्राम ला हलवण्यात आले प्रकृती जास्तच गंभीर असल्यामुळे सेवाग्राम वरूनही नागपूरला हलविण्यात आले नागपूर येथील दवाखान्यात उपचार सुरू असून प्रकृती अजूनही गंभीरच आहे. क्षेत्र सहाय्यक कोरा कार्यालय व्ही एच मडवे व एम डी पीसे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन  मोका चौकशी केली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad