Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे गणेश विसर्जन केन्द्र सुरू

प्रतिनिधि/वर्धा (मंगेश राऊत) : 

                                         महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने अनेकांत स्वाध्याय मंदिर परिसरात नदी,नाले,तळे,विहरी यात गणेश मुर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदुषण थांबविण्यासाठी गणेश विसर्जन केन्द्र सुरू करून गणेश भक्त शंकरराव तेलरांधे यांनी दान दिलेल्या गणेश मुर्तीचे विसर्जन नगरसेवक पवण राऊत यांच्या हस्ते व  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे आणि अनेकांत स्वाध्याय मंदिर चे संचालक अरुण भाऊ चवडे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या उपस्थितीत गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा गेली १७ वर्षापासून पर्यावरण व पाणी प्रदूषन थांबविण्यासाठी गणेश मुर्ती दान व निर्माल्य दान मोहिम महाराष्ट्र भर राबविते पुढील काळात विसर्जन केन्द्र सुरू करून गणेश भक्तांना पर्याय उपलब्ध करून दिले.

              यासाठी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या बाजूने निकाल मिळवून घेऊन सरकार व स्थानिक प्रशासनाने यात भुमिका घ्यावी असे स्पष्ट निर्देश दिले प्रबोधन व पाठपुरावा यामुळे सरकार व स्थानिक प्रशासनाने अनेक संस्था संघटनांनी पर्यायी विसर्जन हौद उपलब्ध करून दिले वर्धेतही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने अनेकांत स्वाध्याय मंदिर,रोटरी क्लब ऑफ गांधी सिटी यांचे सहकार्य घेवून ही मोहीम दरवर्षी राबविण्यात येते तर जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून पवणार येथील नदीचे प्रदुषण थांबविण्यासाठी मोठा हौद गणेश मुर्ती विसर्जनासाठी प्रवृत्त केले तर नगर परिषद प्रशासनाकडेही पाठपुरावा करून शहरात गणेश मुर्ती विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करवून घेतली ज्याला आता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

              गणेश मुर्ती विसर्जन केन्द्र सुरू करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपदाधिकारी सारिका डेहनकर, प्रकाश कांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले यांनी केले तर सुत्र संचालन युवा विभागाचे प्रमुख निखिल जवादे यांनी केले आभारप्रदर्शन महिला विभागाच्या जिल्हा कार्यवाह व्दारकाताई ईमडवार यांनी केले कार्यकम यशस्वी करण्यासाठी मयुरी बिजवार , सुनिता सहारे विक्की बिजवार,पंकजा गादेवार कविता लोहट,आशिष रायपुरे, सचिन महंतारे मनोज नरांजे, विवेक भिरंगे, चैतन्य जोशी,सतिश मोहनापुरे,रवि तडस गोलू मानकर, आदित्य दरने, चैतन्य धनविज,प्रशिक गोडघाटे यांनी सहकार्य केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad