Type Here to Get Search Results !

आर्या इंटरनॅशनल स्कुल मुकूटबन येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

झरी/प्रतिनिधी : 

                      सणांचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यात अनेक सण येतात आणि त्यामुळेच सगडीकडे आनंदाचे वातावरण आपल्याला बघायला मिळते. या श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात आणि याच दिवशी रक्षाबंधन सुद्धा साजरा करतात. बहीण भावाच्या नात्याचा सोहळा म्हणजे रक्षाबंधन. रक्षा म्हणजे रक्षण करणे आणि बंधन म्हणजे बांधणे. 

         आर्या इंटरनॅशनल स्कुल मुकूटबन येथील वर्ग नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनींनी स्वतः हातांनी राखी बनवून त्या शाळेतील आपल्या बांधवाना बांधून रक्षणाची ओवाळणी मागितली. त्याच सोबत मुकूटबन येथील पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष जाऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे पोलीस बांधव जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. खाकी वर्दीतील भावना जपणारा माणूस हा कर्तव्य बजावत असतांना सण उत्सव घरच्या मंडळीसोबत साजरा करणे शक्य होत नाही.बहीण भावाचं नातं अधिक दृढ व्हावं. व पोलिसांविषयी आपुलकी, प्रेम, भावनेचं नातं निर्माण व्हावं. याच संकल्पनेतून आर्या इंटरनॅशनल स्कुल मुकूटबन दरवर्षी प्रमाणे पोलीस बांधवांना राखी बांधून औक्षण करून रक्षणाचे वचन मागतात.

        सर्व विद्यार्थ्यांनींनी राखी बांधून रक्षाबांधन कार्यक्रम साजरा केला.ठाणेदार साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांनींना चॉकलेट  दिले. यावेळी ठाणेदार श्री संतोषजी मनवर, श्री चौधरी, श्री दिलीप जाधव, श्री पातूरकर, श्री सुरपाम, श्री संदीप बोरकर, व इतर सर्व पोलीस बांधव उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad