Type Here to Get Search Results !

ग्रंथालय कर्मचारी संघटनेकडून वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण

वणी : 
            वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांची हक्काची संघटना असावी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी तिन्ही तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी वणी येथे गठित करण्यात आली होती. 

   आज दि. २२ ऑगस्ट २०२४ संघटनेच्या वर्धापनदिन निमित्त वणी शहरात श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळ वाचनालय वणी येथे विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात मुख्याध्यापिका  कु. विजया देवाडकर यांच्या हस्ते तसेच नगर वाचनालयाच्या प्रांगणात वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरातील विविध ठिकाणी देखील वृक्षारोपण करण्यात आले. 

            निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच भविष्यात पाण्याची समस्या गलोबल्वर्मीची समस्या निर्माण होऊ नये इत्यादी कारणे या साठी भविष्याची उपाययोजना ......

         सार्वजनिक  ग्रंथालय कर्मचारी संघटनेचा वर्धापन दिन सोहळा शहरातील नगर वाचनालय येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष देवेंद्र भाजीपाले, सचिव प्रमोद लोणारे, संघटक गजानन कोकुडे यांनी कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करणार असून संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सहसचिव सुभाष राखुंडे, प्रसिद्धी प्रमुख दिवाकर कावडे, सहसंघटक अरविंद दुधलकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

        यावेळी सुरेंद्र विधाते यांनी अध्यक्षीय भाषणातून संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न निकाली लावले तसेच काही प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत, असे प्रतिपादन केले. तसेच संघटनेची भविष्यातील वाटचाल याबद्दल माहिती दिली. 

           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून सचिव प्रमोद लोणारे यांनी संघटना निर्माण करण्याची गरज, संघटनेने केलेले कार्य यांची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष शुभम कडू तर उपस्थितांचे आभार सदस्य राम मेगावार यांनी मानले. यावेळी संघटनेचे सदस्य प्रज्वल गोहोकार, शुभम मोहूर्ले आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad