वृक्ष संवर्धनाचे जागतिक महत्त्व लक्षात घेउन एलआयसी च्या वतीने "प्लॅन्ट ए लाईफ" या मोहिमेअंतर्गत स्थानिक ओमनगर मधील महादेव मंदिर परिसरात दिनांक 20 ऑगस्ट ला वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. एलआयसी अमरावती विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक राजेश सुखदेवे, चिखलगांव च्या सरपंच रुपाली कातकडे, एलआयसी चे विभागीय विक्रय व्यवस्थापक प्रवीण तंतरपाळे आणि एलआयसी वणी चे व्यवस्थापक अजय गेडाम यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. रूपाली कातकडे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी राजेश सुखदेवे यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करून वृक्षतोड थांबावी. यासाठी एलआयसी ने पेपरलेस हे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये रूपाली कातकडे यांनी एलआयसी चे आणि ओमनगर वासीयांचे अभिनंदन केले. स्वागतपर मनोगत अशोक चौधरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन एलआयसी अभिकर्ता संजय गोडे यांनी केले. याप्रसंगी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी एलआयसी वणी चे सहा. शाखा व्यवस्थापक प्रणय तोडकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा देवाळकर, सुधीर ठेंगणे तसेच ओम नगर परिसरातील दिनेशचंद्र श्रीवास्तव, प्रभाकर धुळे, अरुण लाकडे, शरद इंगळे, मारोती दुधकोहळे, चिंतामण क्षीरसागर, हरीश पोटफोडे, पावडे सर, नंदा चौधरी, नंदा लाकडे आणि एलआयसीचे प्रमोद मोटघरे, हेमंत टिपले आणि अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरता अशोक चौधरी, विनोद पारखी,समीर शेख, प्रफुल्ल चौधरी आणि ओम नगर मधील अन्य नागरिकांनी परिश्रम घेतले.



