Type Here to Get Search Results !

जे.डी.चौधरी क.महाविद्यालयाचा 100% निकाल उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोरा/प्रतीनिधी (मंगेश राऊत) :
                                      समुद्रपूर तालुक्यातील जे. डी. चौधरी. जु. सायन्स कॉलेज वासी च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकाला मध्ये 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. राशी ओस्तवाल हिला 94.67 % गुण मिळवून तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला तर  जिल्ह्यातून तृतीय स्थान प्राप्त केले  तर पवन बुरीले 94.50 % गुण मिळवून तालुक्यातुन द्वितीय तर जिल्ह्यातुन चवथा क्रमांक पटकावला आहे. अपूर्व सायंकार याला 92.50 % गुण प्राप्त करून तालुक्यातुन तृतीय स्थान प्राप्त केले आहे  तसेच अनुष्का चांदनखेडे हिला 92.00 % गुण,सानिका कोठेकर 91.83 %, चैतन्य मोरे 91.83 %, साक्षी जैस्वाल 90.33 %, उत्कर्षा खेळकर 90.02 % मिळाले आहे. यापैकी 90 % च्या वर 8 विद्यार्थी, 80 % च्या वर 86 विद्यार्थी व 111 विद्यार्थ्यांना 75 % च्या वर गुण मिळाले आहे.

                                  उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष प्रा.डॉ.वासुदेव चौधरी व सचिव सौ. दुर्गा चौधरी. प्राचार्य प्रणिती चौधरी. प्रा. नितीन डहाके. प्रा. प्रणाली चौधरी,प्रा. प्रवीण भोयर,प्रवीण साबळे, निखील चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वॉटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

SK News Channel
📢 ताज्या बातम्यांसाठी WhatsApp वर Join करा
📲 आत्ताच Join करा
SK News Channel • ताज्या बातम्या थेट WhatsApp वर

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad