Type Here to Get Search Results !

सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची महिला काँग्रेस कमिटीची मागणी

वणी, शुभम कडू : 

                           चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार लढत पाहावयास मिळत आहे. दिनांक 08 एप्रिलला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी करण्यात आले होते. या सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात बहीण भावाच्या पवित्र नात्यावर चुकीच्या पद्धतीने बोलले, यावेळी सभेमध्ये महिला उपस्थित होत्या. त्याच्यासमोर एका दिगज राजकारणानी असे बोलणे योग्य नाही. सुधीर भाऊच्या या वक्तवाने संपूर्ण काँग्रेस मध्ये त्याच्या बद्दल चीड निर्माण झाली असून तीव्र पडसाद उमटत आहे. वणी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

यावेळी संध्या बोबडे, वंदना आवारी, किरण देरकर, गीता उपरे, वंदना दगडी, आशा टोंगे, मंदा बांगरे, छाया निदेकर,आशा कोराटे, साधना गोहोकार, सविता रासेकर, सुरेखा वडीचार, नीता डाहाट, विजया आगबत्तवार, वैशाली देठे, सुरेखा ढेंगळे, सुनीता बोढे यांच्या सह असंख्य महिला उपस्थित होत्या.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad