Type Here to Get Search Results !

B.Sc मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थाची आत्महत्या

वणी : शहरातील गुरूनगर मध्ये राहणाऱ्या एका  विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. सदर विद्यार्थाचे नाव विवेक उमाकांत बोंडे (२०) असे आहे. विवेक हा मेंढोली येथील रहिवासी असून मारेगाव येथील एका महाविद्यालयात B.Sc. द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. विवेक हा बहिणी सह शहरातील गूरूनगर येथे किरायाच्या खोलीत राहत होता.  त्याची बहीण काही कामानिमित्त गावला गेली असता, विवेक ने रूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेक ने हे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण अद्याप करू शकले नाही. पुढील तपासणी वणी पोलीस करीत आहे. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad