Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन २० व २१ फेब्रुवारीला आळंदीत

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५८ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या सहकार्याने दि. २० व २१ फेबुवारी २०२४ रोजी फ्रुटवाले धर्मशाळा, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे येथे संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हभप. मोहनमहाराज शिंदे व प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांनी दिली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे हस्ते अधिवेशनाचे उदघाटन होणार असून खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील हे स्वागताध्यक्ष, तर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. याप्रसंगी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान शांतिब्रम्ह हभप. मारोतीबाबा कुऱ्हेकर यांना संघाच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
या अधिवेशनात ग्रंथ दिंडी, उदघाटन समारंभ, ग्रंथ प्रदर्शन, चर्चा सत्र, परिसंवाद, खुले अधिवेशन व समारोप आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, आमदार महेश लांडगे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी आमदार गंगाधर पटणे, नवसह्यादी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ग्रुप डायरेक्टर सागर मुके, एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्रवीण मसालेवालेचे चेअरमन राजकुमार चोरडिया, प्रदेश भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य रामशेठ गावडे, मी मेवेकरी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष उयोगपती सुधीर मुंगसे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, महाराष्ट्र साहित्य परिषद प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे हभप राजाभाऊ चोपदार, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, माजी विश्वस्त अभय टिळक, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, जोग वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान शिंदे, सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, अधिवेशन समिती अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, महाराष्ट्र वारकरी मंडळाचे अध्यक्ष विलास बालवडकर, नवी दिल्ली इंडियन लायब्ररी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, पुणे विभागाचे अध्यक्ष विजय कोलते, सर्व विभाग व जिल्ह्यांचे पदाधिकारी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 
सदर अधिवेशनामधे ग्रंथालय चळवळीच्या पुढील प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
१) सार्वजनिक ग्रंथालयांना तिप्पट वाढ मंजूर करावी.
२) ग्रंथालय कर्माचाऱ्यांना वेतन श्रेणी व सेवा शर्ती बाबत.
३) नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता देण्यात याव्यात.
४) कार्यरत ग्रंथालयांना दर्जाबदल प्रक्रिया सुरू करावी.
५) राज्य विभाग, जिल्हा ग्रंथालय संघाच्या अनुदानात वाढ.
६) महाराष्ट्रातील ग्रंथ मित्रांना शासन सवलती मिळण्याबाबत.
७) सार्वजनिक ग्रंथालयांच्या विविध समस्या व अडचणी या बाबत.
सदर अधिवेशनामधे ग्रंथालय चळवळीचा विकास व ग्रंथ संस्कृती यावर विचार विनिमय होणार आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad