यात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असून राज्यभरातील सुमारे 150 ते 200 बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा शंकरपट दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. एका गटात पूर्णवाढ झालेली बैलजोडी तर तर दुस-या गटात तरुण (गा-हे) बैलांची जोडी सहभागी होणार आहे. यात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव इत्यादी ठिकाणाहून बैलजोडी येणार आहे. तर वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा ही विशेष स्पर्धा राहणार आहेत. यात केवळ वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतक-यांना सहभागी होता येणार आहे. तरीही नागरिकांनी या शंकरपटाचा थरार अनुभवा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.
20 फेब्रुवारीपासून 3 दिवस रंगणार राज्यस्तरीय शंकरपट!
वणी : वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. खा. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून या विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकरपट ही केवळ बैलांची शर्यत नसून ती आपल्या कृषी संस्कृतीचा एक भाग आहे. गेल्या अनेक शतकांची याला परंपरा आहे. अलिकडे यावरील बंदी उठली. त्यामुळे शेतक-यांची ही परंपरा जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वणी नगरीत 26 वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा रंगणार असल्याने वणी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा थरार अनुभवावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.



