Type Here to Get Search Results !

टीकाराम कोंगरे मित्रपरिवारा तर्फे पुस्तक तुला


वणी, शुभम कडू : सामाजिक कार्यकर्ते, ग्रामीण भागात सुपरिचित असणारे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता जास्तीत जास्त पुस्तके वाचण्यासाठी मिळावी या हेतूने टीकाराम कोंगरे मित्रपरिवारा तर्फे पुस्तक तुला करण्यात येणार आहे.



शिक्षण हे वाघिणीचे दूध असते आणि शिक्षण प्रत्येकाने घेतलेच पाहिजे मात्र या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवायची असेल तर शिक्षण घेऊन होणार नाही तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवावी लागेल. त्यासाठी कठोर परिश्रम घेऊन म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी उत्तम करावी लागणार आहे. त्याकरिता अनेक पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वणी शहरातील आंबेडकर चौक येथे विवेकानंद अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भर व्हावी याकरिता पुस्तकांची तुला करण्यात येणार आहे.


पुस्तकांची तुला उद्या सकाळी दि. २२ नोव्हेंबर २०२३ ला ठीक ११:०० वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image