Type Here to Get Search Results !

स्वतःच आयुष्य कसं घडवायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं - टीकाराम कोंगरे

वणी, शुभम कडू : आजच्या युगामध्ये सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी धावताना दिसतात. मात्र हे युग स्पर्धेचे असल्यामुळे शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे, त्यातच जो कठोर परिश्रम घेतो त्याला यश नक्कीच मिळते. आज या ठिकाणी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि यशस्वी होतात, जे विद्यार्थी यशस्वी होऊन जिथे नोकरीला जातात. त्यांनी सुद्धा या अभ्यासिकेमध्ये येऊन भेट दिली पाहिजे आणि विद्यार्थी घडविण्याकरिता त्यांना मार्गदर्शन करून या अभ्यासिकेला पुस्तकांची मदत केली पाहिजे, असे मनोगत टीकाराम कोंगरे यांनी व्यक्त केले.
जन्मदिवसानिमित्त पुस्तक तुला करून पुस्तकांची भेट दिली. कोणताही अवाढ्याव्य खर्च न करता शिक्षणाला महत्त्व देऊन स्पर्धा परीक्षेकरिता लागणारे पुस्तके भेट दिली आहे.  पुस्तक तुला करताना टीकाराम कोंगरे यांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तके ही ३१ हजार रुपयांचे पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शंकर वऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष देऊन काम करावे तरच यशस्वी होऊ शकतो, असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाला  पुरुषोत्तम आवारी, वंदना आवारी, संजय खाडे, आशिष मोहितकर, डॉ. मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, मारोती ठेंगणे, वामन कुचणकर, प्रवीण खाणझोडे, रुपेश ठाकरे, मेघश्याम तांबेकर, ज्ञानेश्वर बेलेकर,  संजय सपाट, काजल शेख, रुद्रा कुचंकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने करण्यात आले होते.
प्रा. दिलीप मालेकर, प्रफुल भगत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले असून स्वामी विवेकानंद अभ्यासिकेची उत्तम जवाबदारी सांभाळतात.
कार्यक्रमाचे संचालन शंकर घुगरे व आभार निलेश भोस्कर यांनी केले असून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीकाराम कोंगरे मित्रपरिवारा तर्फे स्वामी विवेकानंद वाचनालयात पुस्तक तुला  👇

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image