Type Here to Get Search Results !

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठित

 


वणी/प्रतिनिधी :  वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांची हक्काची संघटना असावी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी तिन्ही तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठित २२ ऑगस्ट रोजी वणी येथे गठित करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र विधाते, उपाध्यक्षपदी देवेंद्र भाजीपाले, सचिवपदी प्रमोद लोणारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्याबरोबरच सहसचिव सुभाष राखुंडे, कोषाध्यक्ष शुभम कडू , कार्यवाह गजानन कोकुडे, सहकार्यवाह दिवाकर कावडे, सदस्य अरविंद दूधुलकर, अमोल पेटकर, उमेश रासेकर, राम मेगावार, ललित पडोळे, प्रज्वल गोहकार यांची निवड झाली. संघटना वाढीस व बळकट करणार. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सुरेंद्र विधाते यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

SK News Channel
📢 ताज्या बातम्यांसाठी WhatsApp वर Join करा
📲 आत्ताच Join करा
SK News Channel • ताज्या बातम्या थेट WhatsApp वर

Below Post Ad