वणी, शुभम कडू : मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून एलईडी व्हिडीओ वॉलद्वारे लाइव्ह मॅच थेट प्रक्षेपण आज दि. १९ नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी ०२:०० वाजतपासून होणार आहे. डी.जे. साऊंड सिस्टिम व लाईट्सद्वारे या मॅच चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय टीमने न्युझीलंडचा पराभव करून अंतिम सामन्यात पोहोचला आहे तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलिया टीम सुद्धा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. या India vs Australia World Cup 2023 Final Match मध्ये कोणाची हार आणि कोणाची जीत होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.
हीच India vs Australia World Cup 2023 Final Match मोठ्या एलईडी स्क्रीनवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे दाखविण्यात येणार आहे. वणीकर जनतेने मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


