वणी, शुभम कडू : भारताच्या माजी पंतप्रधान, आयरन लेडी स्व. इंदिरा गांधीं यांची १०६ वी जयंती निमित्त इंदिरा गांधी चौक मधील स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन. एस. यू. आय. तर्फे हारार्पन करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी वामन कुचनकर यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवन चरीत्राबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ऍड. देविदास काळे, जिल्हा महिला अध्यक्ष वंदना आवारी, सेवादल प्रदेश सचिव वामन कुचनकार, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद वासेकर, माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर, डॉ मोरेश्वर पावडे, सरिता रासेकर, घनश्याम पावडे, महादेव दोडके, रवींद्र कोटावार गजानन कोटावार, ज्ञानेश्वर बोनगीरवार, सुरेश काकडे, रमेश पुंडरावार, त्रंबक दासरवार, गणेश बोढे, सुबोध आवारी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



