वणी/प्रतिनिधी : म.रा.किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा व भारतिय कम्युनिस्ट पक्षाचा केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात प्रागतिक आघाडिचे वणी विधानसभा उमेदवार कॉ. अनिल हेपट, भाकपचे जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे यांचे नेत्रुत्वात प्रचंड मोर्चा निघाला. मोर्चा शहरात मुख्य मार्गाने फिरूनतहसील कार्यालयावर धडकला व शासनास विवीध मागण्यांचे निवेदन सादर केले...१) केंद्र सरकारने खवडी कापूस खरेदी करण्याचा निर्णय मागे घेऊन संपुर्ण कापूस खरेदी करण्यात यावा. २) शेतिमालाचे भाव पाडणे बंद करावे, आयात निर्यात धोरणात अवाजवी हस्तक्षेप बंद करावा. ३) किमान हमीभावाचा कायदा करावा. ४) पैसा नको धान्यच द्या जुनी धान्य योजना नियमित सुरू ठेवावी. ५) अतिक्रमणधारक शेतकरयावर जबरदस्तिने शेतिवरून हुसकावून लावणे बंद करा व त्वरीत कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. ६) वाढती महागाई कमी करण्यात यावी. ७) कंत्राटी पध्दतिने नोकर भरती बंद करावी व कायम स्वरुपाची नोकर भरती करावी.८) सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करा. ९) सरकारी उद्योगाचे, बँक, दवाखाने, शेतिचे खाजगीकरण बंद करावे. १०) धार्मिक कार्यक्रमात ध्वणीनियंत्रनाची सक्ती करावी. ११) पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकरयांचे शेती पिक धोक्यात असल्याने पिक विम्याचे योग्य सर्वे करून विमा क्लेम देण्यात यावा. १२) सोयाबीन पिकांवर येलो मोझॉक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे संपुर्ण सोयाबीन पिक आताचे गेले आहे त्यामुळे सर्वे करून मदत करावी. या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चामध्ये कॉ.बंडु गोलर, वासुदेव गोहणे, प्रविण रोगे, नितेश तुराणकर, पंढरी मोहीतकर, रामदास पखाले, चंदु पोतराजे, हरिच्छंद्र तुराणकर, अथर्व निवडिंग, डॉ. श्रिकांत तांबेकर, लता रामटेके, पुंडलिक ढुमणे, प्रमोद पहूरकर, शंकर केमेकर, पांडुरंग ठावरी यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या