स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, कुंभा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
0
मारेगाव/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, कुंभा च्या वतीने वाचनालय सभागृहात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव व्ही. सी. भंसाळी तर प्रमुख पाहुणे संस्था सभासद पी. एम. उरकुडे सर भारत विद्या मंदीर कुंभा येथील शिक्षक ए. सी. फुलमाळी अरब, के. के. खचकड सर तसेच भारत विद्या मंदीर येथील विद्यार्थी व वाचक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पुजन पाहुण्यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयातील विविध पुस्तक देवून त्यांचेकडून वाचन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्रावर प्रकाश टाकून विद्यार्थाना मोलाचे मार्गदर्शन केले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून वर्ग ८-१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांमधून कु. दृष्टी मोहुर्ले, कु. शिवाणी वर्मा, कु. कीर्ती पावनकर, कु. गुणगुण उमरकर, कु. सोनू गायकवाड या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा क्रमांक पटकाविला. या यशस्वी स्पर्धकांना अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्याल आले. या कार्यक्रमाचे संचालन दिवाकर कावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन कोकुडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या