Type Here to Get Search Results !

नृसिंह व्यायाम शाळेला संजय खाडे यांच्याकडून २१ हजाराची देणगी


वणी, शुभम कडू : शहरातील प्रसिद्ध असलेल्या नृसिंह व्यायाम शाळेत दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी सहकारी पतसंस्था लिमिटेड वणीचे अध्यक्ष संजयभाऊ खाडे व त्यांचे चिरंजीव धनंजय खाडे उपस्थित होते. यावेळी नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठी व कबड्डी चमुनी पुष्पगुच्छ देऊन संजयभाऊ खाडे व धनंजय खाडे यांचा सन्मान केला.
याप्रसंगी विचार व्यक्त करताना संजयभाऊ खाडे म्हणाले नृसिंह व्यायाम शाळा फार जुनी असून या संस्थेने अनेक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवले आहे. व्यायाम शाळा ही आरोग्य हीच धन संपदा आहे. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते तरच आपण सर्वच क्षेत्रात काम करू शकतो असे मत व्यक्त केले त्यामुळे आज याप्रसंगी समाजाचं काहीतरी देणं लागत म्हणून नृसिंह व्यायाम शाळेला 21 हजार रुपयांची देणगी दिली.
यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, सहसचिव पांडुरंग ताटेवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, संचालक दिलीप येमुलवार, रमेश शर्मा, विलास आसुटकर, सूर्यकांत मोरे, कन्हैया पारखी, नरसिंह भाई पटेल, इब्बू शेख, मुन्नाभाई शेख, राजकुमार मोरे, प्रेम मेश्राम, देवा राठोड, कुणाल ठोंबरे, यश काकडे, सुजल गाडगे, फैय्याज अली, सय्यद समीर, बंडू निंदेकर, वैष्णवी चामुलवार, कु आयु उगले, अण्वि इंगोले, गौरी पिदूरकार, संकेत आक्केवार, सागर डोंगरे, समीर सय्यद, कु छकुली वाढई, राज जमदाडे, डॅनिश पठाण, दुशांत आवारी, माई बोढे, श्रावणी आवारी, डिंपल बदखल, काजल गाडगे, शीतल आडे, बोढे, दोडके उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे आभार सूर्यकांत मोरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नृसिंह व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image